औरंगाबाद : राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांना निवेदन देताना शिवसेना आमदार अंबादास दानवे. सोबत माजी महापौर विकास जैन.  
मराठवाडा

राज्यपालांना भेटले शिवसेना आमदार अंबादास दानवे

मधुकर कांबळे

औरंगाबाद - विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रदीर्घ रजेवर गेलेले महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी आपली रजा वाढवून घेतली. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या अतंर्गत सुरू असलेल्या शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. आरोग्य, कचरा, रस्ते, पाणीपुरवठा अशी अनेक महत्वाची कामे रखडल्यामुळे महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त द्यावा अशी मागणी करणारे पत्र शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पाठवले आहे. 

गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद महापालिकेला आयुक्‍त नाही. डॉ. निपूण विनायक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच प्रदीर्घ रजेवर निघून गेले होते. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दहा तारखेपर्यंत डॉ. निपुण विनायक यांची रजा होती , त्यांनी पुन्हा रजा वाढवून घेतली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रभारी कार्यभार पाहण्याच्या सूचना असल्याने ते मंगळवारी (ता.19) झालेल्या सर्वसाधारण सभेला हजर राहिले नाहीत. परिणामी महापालिकेची सर्वसाधारण सभा देखील आयुक्तांच्या गैरहजेरीतच झाली. शहरात डेंग्यूमुळे गेल्या दोन महिन्यात 11 जणांचे बळी गेले आहेत. शहरात कचऱ्याचा, सार्वजनीक आरोग्याचा, पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे तर महापालिका प्रशासनाचे प्रमुखच कार्यालयात रहात नसल्याने संपुर्ण प्रशासकीय यंत्रणाच सुस्तावली आहे. 

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी आयुक्तांना शासनाकडे परत पाठवुन सक्षम आयुक्‍त देण्याची राज्यपालांकडे मागणी करावी अशी महापौराकंडे केली होती. महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील आयुक्‍तांच्या सततच्या रजेवर जाण्यामुळे प्रशासन ढेपाळल्याची वस्तुस्थिती मान्य करुन विभागीय आयुक्‍तांच्या माध्यमातुन शहरातील सर्व परिस्थिती राज्यपालांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. 

या पार्श्‍वभुमीवर बुधवारी (ता.20) शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी देखील राज्यपालांकडे पत्र पाठवून महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी केली आहे. परंतु आयुक्त प्रदीर्घ रजेवर असल्याने दैनंदिन कामात अनंत अडचणी येत आहेत. नजीकच्या काळात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त मिळणे गरजेचे आहे. राज्यपाल महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन महापालिकेत कायमस्वरुपी आयुक्तांची नेमणूक करावी अशी विनंती देखील या पत्रात करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

Ram Temple Staff Verification : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांचे चारित्र्य तपासणार अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा मोठा निर्णय

Drishyam 3 Collection: विजय साळगावकरची जादू पुन्हा चालली! ‘दृश्यम 3’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

SCROLL FOR NEXT